esakal | महिलांचा सन्मान सदैव केला पाहिजे : सरपंच जितेंद्र साठे

बोलून बातमी शोधा

Sarpanch Jitendra Sathe has said that women should always be respected

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडाळा ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केलेल्या सहा आशा सेविका व ग्रामपंचायतीच्या तीन महिला सफाई कामगार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

महिलांचा सन्मान सदैव केला पाहिजे : सरपंच जितेंद्र साठे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडाळा (सोलापूर) : आता सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून केवळ जागतिक महिला दिनादिवशी त्यांचा सत्कार करायचा आणि इतरवेळी मात्र त्यांच्याशी दुजाभाव करायचा, असे न करता वर्षातील 365 दिवस महिलांचा सन्मान झाला पाहिजे. तरच ख-या अर्थाने मातृशक्तीचा गौरव होईल, असे प्रतिपादन वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे यांनी व्यक्त केले. 

महापालिकेचे कर्मचारी निवृत्ती वेतनाच्या लाभापासून वंचित

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडाळा ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केलेल्या सहा आशा सेविका व ग्रामपंचायतीच्या तीन महिला सफाई कामगार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी सरपंच साठे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच अनिल माळी, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गायकवाड, मनोज साठे, विकास गाडे, दिलीप जमदाडे, सोनल कांबळे, अरुणा मोहिते, निर्मला वीर, रेखा गाडे, निर्मला नागणे, दिपाली सुभेदार, स्वाती गायकवाड यांच्यासह संपत गाडे, कुलदैवत निधी प्रा.लि.चे संस्थापक चेअरमन दत्तात्रय वीर, रवी मोहिते, शरद गायकवाड, मोहन लामकाने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
शिक्षण क्षेत्रातही मुलांपेक्षा मुलीच गुणवत्तेत पुढे आहेत. तेव्हा महिलांचे कौतुक झाले पाहिजे, असे सांगून सरपंच साठे म्हणाले, कुटुंबातून त्यांना प्रोत्साहन मिळाले तर त्या प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक कमवतील. मुलगा-मुलगी हा भेदभाव न मानता मुलींना उच्च शिक्षण देऊन संस्कारक्षम समाज रचनेला सर्वांनी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे काका साठे म्हणाले. वडाळा ग्रामपंचायतने आमच्या कामाची दखल घेऊन सत्कार केला ही बाब आमच्यासाठी अभिमानाची असल्याचे अर्चना कांबळे यांनी सांगितले. यावेळी विकास गाडे यांचेही भाषण झाले. ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालन तर पांडुरंग नागणे यांनी आभार मानले.