सलगर बुद्रुक - मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील एकूण 79 ग्रामपंचायतीच्या सन 2025 ते 2030 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार असून ही सोडत मंगळवार दिनांक 22 रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयातील प्रांगणात काढण्यात येणार आहे.
या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण अशा प्रवर्गामध्ये सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. तसेच याचवेळी महिला सरपंच पदाचे सुद्धा आरक्षण शासकीय नियमानुसार व सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे.
सदरची आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी यांच्या नियंत्रणाखाली व तहसीलदार मदन जाधव यांच्या उपस्थितीत पार पाडली जाणार आहे. तरी आरक्षण सोडतीवेळी मंगळवेढा तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.