
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 2025 ते 2030 या कालावधी साठीचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ता.15 जुलै रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती कार्यालय, मोहोळ येथील सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली. सरपंच हा जनतेतूनच निवडण्यात येणार आहे.