‘ती’ गुलालात माखली, मग ‘ही’ का घाबरली?

सांगली अन्‌ सातारा डीसीसीच्या निकालाची सोलापुरात चर्चा
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुक
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकsakal

सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील जिंकले. राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे काका आमदार मोहनराव कदमही जिंकले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पडले. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेही पडले. सांगली, सातारा डीसीसी निवडणुकीचा निकाल राज्यभर चर्चेत आला आहे. सांगली आणि सातारा डीसीसी निवडणुकीच्या गुलालात माखली असताना मग सोलापूर डीसीसी निवडणुकीला का घाबरली? असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या राजकारणात आमदार शशिकांत शिंदे यांचा करेक्‍ट कार्यक्रम कोणी केला?, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी डाव साधला? की भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने आमदार शिंदे यांचा करेक्‍ट कार्यक्रम केला? याचे राजकीय कोडे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली व सातारा जिल्हा बॅंकेसोबतच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेलाही गुलालात माखण्याची संधी आली होती. गुलालात माखण्याऐवजी सोलापूर डीसीसी निवडणुकीला का घाबरली? हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुक
भिवंडीत लग्नमंडपात फटाके फोडणे भोवले; आग लागल्याने २५ दुचाकी खाक

सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलून कोणी कोणाचे हित साधले? हा प्रश्न आजही सोलापूरच्या राजकारणात अनुत्तरीतच आहे. सांगली जिल्हा बॅंकेला ९४ वर्ष पूर्ण झाली. संचालकांच्या खाबुगिरीत एकेकाळी अडकलेल्या सांगली बॅंकेवर तब्बल पावणे तीन वर्षे प्रशासक होते.

खाबुगिरीतील सांगली बॅंकेला पुन्हा संचालकांच्या हाती करणारे सांगली डीसीसीचे डॉक्‍टर तथा प्रशासक शैलेश कोथमिरे सध्या सोलापूर डीसीसीचे प्रशासक आहेत. संचालक गेले आणि प्रशासक आले, सोलापूर बॅंक मात्र आजही जुनेच घाव सोसत आहे. जिल्हा बॅंक निवडणुकीच्या गुलालात माखणार की प्रशासकाच्या माध्यमातूनच बॅंकेचा कारभार हाकला जाणार? याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुक
दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क

कोण होतीस तू...

सन १९७५ मध्ये आलेल्या झुंज या मराठी चित्रपटात गीतकार जगदीश खेबुडकर यांनी गायलेले ‘कोण होतीस तू, काय झालीस तू... अग वेडे कशी वाया गेलीस तू’... हे गाणं आज सोलापूर जिल्हा बॅंकेच्या आर्थिक आणि राजकीय स्थितीला तंतोतंत लागू पडत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात असलेल्या पुणे जिल्हा बॅंकेची स्थापना १९१७ मध्ये झाली. त्यानंतर अवघ्या एका वर्षात म्हणजे १९१८ ला सोलापूर जिल्हा बॅंकेची स्थापना झाली.

सांगली जिल्हा बॅंक १९२७ ला तर कोल्हापूर जिल्हा बॅंक १९३८ ला सुरु झाली. सातारा जिल्हा बॅंक १९५० ला सुरु झाली. पुणे जिल्हा बॅंक जेव्हा स्थापन झाली त्यानंतर अवघ्या एका वर्षात १९१८ ला सोलापूर जिल्हा बॅंक स्थापन झाली. १०३ वर्षांचा इतिहास असलेल्या आणि पूर्वजांनी जपलेल्या सोलापूर डीसीसीची कशी व का वाट लागली? याचा धांडोळा आणि भविष्याचा वेध घेणारी ही वृत्तमालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com