esakal | सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

Satlingappa Mhetre a senior Congress leader from Solapur district has passed away

सातलिंगप्पा म्हेत्रे हे तालुक्‍याचे पितामह व कणखर नेते म्हणून ओळखले जात होते. दुधनी नगरपालिकेवर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुमारे 55 वर्षापेक्षा जास्त वर्ष सत्ता राखण्यात त्यांनी यश मिळविले होते. सुमारे चाळीस वर्ष त्यांनी दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले. अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन 

sakal_logo
By
चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेते, दुधनीचे माजी नगराध्यक्ष व दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा म्हेत्रे (वय 90) यांचे वृद्धापकाळाने आज सायंकाळी साडेसात वाजता निधन झाले. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व कॉंग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे ते वडील होत. 
उद्या शनिवारी दुपारी अडीच वाजता दुधनी येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून दुधनी येथील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सातलिंगप्पा हे तालुक्‍याचे पितामह व कणखर नेते म्हणून ओळखले जात होते. दुधनी नगरपालिकेवर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुमारे 55 वर्षापेक्षा जास्त वर्ष सत्ता राखण्यात त्यांनी यश मिळविले होते. सुमारे चाळीस वर्ष त्यांनी दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले. अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. अक्कलकोट तालुक्‍यासह शेजारील कर्नाटक राज्यातील आळंद, अफजलपूर, विजापूर व गुलबर्गा या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दुधनी नगरपरिषदची नूतन प्रशासकीय इमारत त्यांनी शासनाकडून निधी मिळवून उभारली. मातोश्री लक्ष्मी शुगर या खाजगी साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये त्यांनी मुलगा सिद्धाराम म्हेत्रे यांच्या सोबत परिश्रम घेतले. सातलिंगप्पा यांचे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पश्‍चात माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे व मल्लिनाथ म्हेत्रे ही तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

loading image
go to top