Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

सावळेश्वर टोलनाक्यावर 'ओव्हरलोड'च्या नावाखाली जादा पैसे मागून ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Assault on Truck Driver at Savaleshwar Toll Plaza Over Overloading Dispute

मारहाण झालेला चालक सिद्धलिंगय्या स्वामी याचा फोटो पाठवला आहे

sakal

Updated on

मोहोळ : तुमची मालट्रक ओव्हरलोड आहे, असे सांगत जादा पैशाची मागणी करणाऱ्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चालकाला बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्या प्रकरणी दोघा जणा विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धलिंग राचेय्या स्वामी वय 31 रा सस्तापूर ता बसवकल्याण असे मारहाण केलेल्या चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवार ता 24 रोजी दुपारी तीन वाजता सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर घडली. धनराज हाके रा जुना तुळजापूर नाका सोलापूर व नवनीत डांगे रा मडके वस्ती पुन्हा नाका सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Benefits for Daily Commuters and FASTag Users
Pune Mumbai Expressway Somatane Toll Plaza
Vehicles passing through a barrier-free toll plaza using FASTag
civil hospital
Marathi News Esakal
www.esakal.com