
सोलापूर : गावागावांतील अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री थांबविण्यासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ सुरू केले. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ‘हातभट्टीमुक्त गाव’ अभियान, यामुळे आता निश्चितपणे व्यसनाच्या आहारी गेलेला मुलगा, पती, नातू सुधारेल अशी अनेकांना आशा होती. कुटुंबाची जबाबदारी उचलणाऱ्या तरूणाने बहिणीच्या विवाहात झालेले कर्ज फेडले. आई-वडिलांना तो मुलगा म्हातारपणीची काठी बनल्याचा आनंद झाला, मात्र आता तो गावात सहज मिळणाऱ्या हातभट्टीच्या आहारी गेल्याने वयाच्या ६० वर्षांनंतर त्या आई-वडिलांना पुन्हा मजुरीवर जावे लागत आहे. ही व्यथा आहे मोरवंची (ता. मोहोळ) गावातील एका कुटुंबाची.