

Solapur police investigating a case of alleged harassment involving a school headmaster.
sakal
सोलापूर : येथील सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित जुन्या शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षिकेचा विनयभंग केला. जुलै २०२४ ते १९ जानेवारी २०२६ या काळात मुख्याध्यापकाने वारंवार सांगूनही छळ सुरूच ठेवला. त्याच्या सततच्या त्रासाला वैगातून शिक्षकेने पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल होण्याचा अंदाज येताच मुख्याध्यापक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एम. डी. बिराजदार असे त्या संशयित आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.