
सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून गुड न्यूज आहे. राज्यातील गरजु विद्यार्थ्यांना मोफत चष्मे दिले जणार आहेत. यासाठी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यातून गरज असलेल्या विद्यार्थ्यांची तपसाणी केली जाणार आहे.
राज्यातील मुलांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण अधिक असून त्यामुळे मुलांच्या गुणत्तेवर परिणाम होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन सरकारच्या वतीने आता गरजू विद्यार्थ्यांना चष्मे वाटप केले जाणार आहेत. राज्यात ८१ हजार ५५६ शासकीय व निमशासकीय शाळा आहेत. त्यामध्ये १ कोटी २१ लाख ६७ हजार ५८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामधील दृष्टीदोषाच्या मुलांचे प्रमाणे ८ टक्के आहे. यावरुन दरवर्षी ९ लाख ७३ हजार ४०७ मुलांना दृष्टीदोषाबाबत उपचाराची आवश्यकता असल्याचे समोर आले होते. त्यानूसान अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जात होती. परंतु सर्व गरजु विद्यार्थ्यांना चष्मे पुरवणे शक्य नव्हते. महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानार्तंगत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ६ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यंची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. त्यांच्यात आढळणाऱ्या आजारावर निदान केले जाते. २०१८-१९ वैद्यकीय पथके तयार केली होती. दृष्टीदोषामुळे मुलांचे वाचन, लिखाण व अभ्यास इत्यादी शालेय गतिविधींवर विपरीत परिणाम होत आहे. शैक्षणिक गतिविधीत सुधारणा होऊन ते सुशिक्षित व सक्षम नागरिक निर्माण व्हावा म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शासकीय व निमशासकीय ८१ हजार ५५६ शाळांमधील विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी करुन आवश्यकतेनुसार मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करुन दृष्टीदोष असलेले विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. नेत्रसहाय्यकांच्या भेटीचे वेळापत्रक तयार करुन शाळेत त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर गरज असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत किंवा त्याच्या घरी कुरीयरने चष्मा पाठवला जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात सध्या ७५० नेत्रसहाय्यक कार्यरत आहेत. त्याप्रमाणे एका नेत्रसहाय्यकाने शालेय वर्षात १२९८ विद्यार्थ्यांची तपसाणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. पुरवठादाराकडून सबंधीत विद्यार्थ्यांला त्याच्या घरी किंवा शाळेत चष्मा पुरवला जाणार आहे. विद्यार्थ्यांला दिलेला चष्मा योग्य आहे किंवा नाही याचा खतरजमा केली जाणार आहे. लाभार्थ्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नेत्रसहाय्यकाने योग्य ती खबरदारी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचा नंबर बदलल्यास त्याची पुढच्या वर्षात तपासणी करुन स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे.
जनजागृतीही केली जाणार...
विद्यार्थ्यांनी डोळ्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती जनजागृतीद्वारे दिली जाणार आहे. २०२०-२०२१ या वर्षापासून अंमलात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मान्यता देण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेल्या ११९५ वैद्यकीय पथकांमार्फत विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.