एक असताना दुसरी केली! 'पत्नीच्या संमतीविना केलेलं लग्न भाेवलं', नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
लग्नात व रिसेप्शनमध्ये घर व गाडी घेण्यासाठी पाच लाख रूपये दिले नसल्याने राहुल याने स्नेहल हिचा मानसिक छळ केला. तो लग्नासाठी तुझ्यापेक्षा चांगल्या मुली मिळाल्या असत्या, असा टोमणा सतत मारायचा. पत्नी असतानाही त्याने एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले.
सोलापूर : लग्नात घर व गाडी घेण्यासाठी पाच लाख रूपये न दिल्याने पतीने पत्नीचा छळ केला. त्याने एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. तसेच पत्नीच्या संमतीविना एका महिलेशी लग्न केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.