पृथ्वीतलावरून कोरोना नाहीसाच झालाय जणू !

पृथ्वीतलावरून कोरोना नाहीसाच झालाय जणू! पंढरपुरातील स्थिती
पृथ्वीतलावरून कोरोना नाहीसाच झालाय जणू !
पृथ्वीतलावरून कोरोना नाहीसाच झालाय जणू !Canva
Updated on
Summary

कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरल्यानंतर पंढरपूर शहरात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना (Covid-19) महामारीची दुसरी लाट ओसरल्यानंतर पंढरपूर (Pandharpur) शहरात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. त्यामुळे शहरातील "गर्दी हटेना व कोरोना घटेना' असे चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोना पृथ्वीतलावरून नाहीसा झाला आहे की काय असे वाटावे, अशी काही नागरिकांची वागणूक दिसून येते. (Seeing the crowd in Pandharpur, there are signs that the corona infection is on the rise-ssd73)

पृथ्वीतलावरून कोरोना नाहीसाच झालाय जणू !
ड्रॅगनफ्रूट लागवडीला 40 टक्के अनुदान ! जाणून घ्या या फळाचे महत्त्व

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी सोहळ्यादरम्यान पंढरपूर शहर व लगतच्या 10 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदी (Curfew) दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्‍यात होती. मात्र संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतर शहरातील श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, नवीपेठ भाजीबाजार, स्टेशन रोड, नवीन बसस्थानक, विविध शासकीय कार्यालये आदी ठिकाणी शहर व तालुक्‍यातील नागरिकांची गर्दी होत आहे. यातील बहुतांश नागरिक कोरोना नियमांचे पालन करताना आढळून येत नाहीत. कोरोना पृथ्वीतलावरून नाहीसा झाला आहे की काय असे वाटावे, अशी काही नागरिकांची वागणूक दिसून येते. योग्य पद्धतीने मास्कचा वापर न करणे, कुठेही पचापचा थुंकणे, सुरक्षित अंतराचे पालन न करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे असे काही नागरिकांचे आचरण असते. यामुळे कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढू लागला आहे.

पृथ्वीतलावरून कोरोना नाहीसाच झालाय जणू !
'उजनी'च्या ऊस पट्ट्यात आता पिकताहेत एक्‍स्पोर्ट क्वालिटीची फळे !

मागील काही दिवसांपासून शंभरीच्या आत असलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे. तर अद्यापही 565 कोरोना रुग्ण वैद्यकीय उपचार घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी नागरिकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत. दरम्यान, कोविड-19 च्या लसीकरणाची मोहीम शहर व तालुक्‍यातील काही केंद्रांवर सुरू असली तरी अद्यापही तिने वेग पकडलेला नाही. नियमित लस उपलब्ध होत नसल्याने इच्छा असूनही नागरिकांना लस घेता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केल्यास संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखता येईल, असा इशारा येथील वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com