
Seine River Flood
sakal
थोडक्यात:
सीना नदीने २४ सप्टेंबर २०२५ रोजी ४३०.६ मीटर पातळी गाठून १९४९ नंतरचा सर्वात मोठा पूर अनुभवला.
अतिवृष्टीमुळे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांची हवाई मदतीने सुटका करण्यात आली.
सीना-कोळेगाव प्रकल्पातून पहिल्यांदाच १.०४ लाख क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग सोडला गेला, जो इतिहासातील सर्वात मोठा विसर्ग आहे.
प्रमोद बोडके
Seine River Flood: केंद्रीय जल आयोगाच्या वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) निरीक्षण केंद्राकडील आतापर्यंतची आकडेवारी आणि यावर्षीच्या सीना नदीच्या महापुराच्या पाहणीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे सीना नदीची उच्च पूर पातळी यापूर्वी १९४९ मध्ये ४३० मीटर एवढी नोंदविली गेली होती. यावर्षीच्या महापुराने तब्बल ७६ वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले. सीना नदीने २४ सप्टेंबर २०२५ रोजी ४३०.६ मीटर अशी नवी उच्च पूर पातळी तयार केली आहे.