
-सिद्धाराम पाटील
सोलापूर : बजरंग दलाच्या गोरक्षकांनी पाळत ठेवून रविवार-सोमवारच्या मध्यरात्री पानमंगरूळ (ता. अक्कलकोट) येथे २५ गोवंशांची चोरटी वाहतूक रोखली. सात गाड्यांमध्ये दाटीवाटीने बांधून बेकायदा पद्धतीने गोवंश नेले जात होते. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस सोमवारी पहाटे घटनास्थळी पोहोचले. गोरक्षकांनी सात गाड्यांसह २५ गोवंश पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तस्करांवर गुन्हाही दाखल केला. परंतु, तस्करांनी स्वत: शेतकरी असल्याचे सांगत पोलिसांवर राजकीय दबाव आणला. आणि गोरक्षकांनी पकडलेले गोवंश पोलिसांनी पुन्हा तस्करांच्याच ताब्यात देऊन टाकले. यासाठी पोलिसांनी तस्करांकडून बंधपत्र घेण्याचा सोपस्कार केला.