
"मोहोळ पोलीसांनी पकडला तीन लाखाचा गुटखा"
मोहोळ : मोहोळ शहरात अवैद्य मार्गाने विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला तीन लाख रुपये किमंतीचा गुटखा मोहोळ पोलिसांनी ता 6 एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास जप्त केला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .राजकुमार शिवशंकर कुर्डे रा साठे नगर मोहोळ ( वय 35 ) असे अटक केलेल्याचे नाव आहे .
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार,मोहोळ शहरातील साठे नगर येथे अवैद्य मार्गाने विक्री करण्यासाठी गुटखा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मोहोळचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली होती . त्यानुसार मोहोळ पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे जाऊन खातर जमा केली असता सदर ठिकाणी विक्री करीता एका गाळ्यामध्ये तीन लाख बारा हजार रुपये किंमतीचा गुटखा व इतर पान मसाल्याचा साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले .
हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे . या प्रकरणाचा तपास मोहोळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत . सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक सायकर , पोलीसहेड कॉन्स्टेबल शरद ढावरे, पांडुरंग जगताप ,पोलीस नाईक अमोल घोळवे . हरिश थोरात यांनी केली .
Web Title: Seized Mohol Police Gutkha Stored Sale Illegally City Confiscated
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..