ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपरत्न पुरस्काराने सन्मान | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपरत्न पुरस्काराने सन्मान करताना आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, शहराध्यक्ष विक्रम पाटील आदी.
कार्यकर्त्यांचा भाजपरत्न पुरस्काराने सन्मान

सोलापूर : कार्यकर्त्यांचा भाजपरत्न पुरस्काराने सन्मान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भाजप शहरमध्य पूर्व मंडलच्यावतीने आयोजित स्नेहमेळाव्यात पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ‘भाजपरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शहरातील दुस्सा मंगलकार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेता शिवानंद पाटील, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने, शशी थोरात, परिवहन सभापती जय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ कार्यकर्ते राजू कनकट्टी, शशिकला बिर्रु, रामचंद्र जन्नू, राजाराम गुर्रम, लक्ष्मण येमूल, उमेश आडम, शिवानंद बुक्का, विश्वनाथ मादगुंडी, तुळशीदास भुतडा, चंद्रकांत धोत्रे, सिद्धाराम कोंडे, बाबूराव उप्पीन यांचा भाजपरत्न स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

हेही वाचा: वाळूज : ढगाळ हवामान आणि अवकाळीमुळे बळीराजा संकटात

जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपर्यंतचा हा प्रवास आहे. या प्रवासात लाखो कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावरच पक्षाचा विस्तार झाल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. तर, सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामकाजाचा व त्यांच्या संघर्षाचा लेखाजोखा मांडला. प्रास्ताविक पांडुरंग दिड्डी यांनी केले. सूत्रसंचालन नागेश सरगम यांनी तर, आभार सुनील गोडगाव यांनी मानले.

loading image
go to top