Bribery Action : ‘माध्यमिक’चा वरिष्ठ सहायक लाचलुचपतच्या जाळ्यात: वरिष्ठ वेतनश्रेणीच्या प्रस्तावासाठी मागितली लाच

तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले आणि त्यातील पहिला हप्ता २० हजार रुपये स्वीकारताना मस्केला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. मस्केविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
A senior assistant from the secondary education department was arrested for accepting a bribe in exchange for a pay scale proposal.
A senior assistant from the secondary education department was arrested for accepting a bribe in exchange for a pay scale proposal.Sakal
Updated on

सोलापूर : शाळेमार्फत वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी एका शिक्षकाचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाकडे पाठविला होता. ते काम करून देण्यासाठी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम अंकुश मस्के याने तक्रारदाराकडे ४० हजाराची लाच मागितली. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले आणि त्यातील पहिला हप्ता २० हजार रुपये स्वीकारताना मस्केला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. मस्केविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com