
वैराग : बार्शी-लातूर रस्त्यावर जामगाव येथील गॅसपंपाजवळ बुधवारी (ता. १६) दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकी-एसटी बसच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील मारुती भगवान आगवणे (वय ७५,रा.धोत्रे) ज्येष्ठाचा जागीच मृत्यू झाला असून, बसचालक अमन रुस्तुम पिरजादे (रा.खानापूर, जि. सांगली) याच्याविरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.