
सोलापूर : सोलापूरची ओळख उत्सवप्रिय शहर अशीच झाली आहे. या शहरात वर्षातील ३६५ पैकी १८० दिवस मिरवणुका असतात. डीजेचा गोंगाट आणि लेझर लाईटचा झगमगाट असतो. आम्हाला या गोष्टीचा आता वीट आल्याचे सांगत सोलापुरातील डीजेग्रस्त ज्येष्ट नागरिकांनी सोलापूरकरांचा आवाज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यावर कानावर घातला. डीजेमुक्तीसाठी सरसावलेले ज्येष्ठ नागरिक पाहून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उद्याच्या (गुरुवार, ता. २१) शांतता बैठकीत १५ जणांना सहभागी होण्याचे आवाहन केले. या बैठकीत समन्वयातून मार्ग काढू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.