Solapur Accident : दोन दुचाकींच्या अपघातात चौघे जखमी; जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश

Serious Bike Accident : विठ्ठल ज्ञानेश्वर जाधव (वय २२), नागेश लक्ष्मण सांळुखे (वय ३५, दोघे रा. शेळगाव आर) हे दोघे बार्शीहून शेळगावकडे येताना वैराग येथील महावितरण कार्यालयासमोर आले. तेव्हा दोन्ही दुचाकींची जोरात धडक झाली. या अपघातात चौघे जखमी झाले.
Accident News
Accident News sakal
Updated on

वैराग : वैराग येथे बार्शी रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. यामध्ये चारजण जखमी झाले आहेत. वैरागच्या जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी (ता. २०) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com