पांगरी : बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर खांडवी शिवारात झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. रस्त्याच्या कडेला मोटारसायकलवर उभ्या असलेल्या व्यक्तीस भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या मोटारसायकलस्वाराने जोरात धडक दिली. या धडकेत युवराज भगवान गायकवाड (वय ४६, रा. श्रीपतपिंपरी) हे गंभीर जखमी झाले आहेत.