
सोलापूर : महेश नगरातील (सम्राट चौक) दुकानातील कामगारांनी बनावट स्वाक्षरी करून बॅंकेतून नऊ लाख रुपये काढून लंपास केल्याची फिर्याद तारा जगदीश जाजू यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार सुदर्शन साका, अरविंद साका, निशिकांत बुलबुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. युको बॅंकेच्या धनादेशाद्वारे प्रत्येकी साडेचार लाख याप्रमाणे ही रक्कम काढल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दुचाकीवरून पडल्याने मेव्हण्याचा मृत्यू
शिवाजीनगर (बाळे) येथील रणजित दादाराव सुरवसे हा त्याचा मेव्हणा धनाजी भगवान खुर्द (रा. शिवाजीनगर, बाळे) याला दुचाकीवर (एमएच- 13, बीए- 2117) बसवून सोलापुरातून शिवाजी नगरकडे निघाला होता. त्या वेळी गाडी कंट्रोल न झाल्याने गाडी सर्व्हिस रोडवर स्लीप होऊन पडली. त्या वेळी मागे बसलेले धनाजी रस्त्यालगत असलेल्या दुभाजकावर पडला. त्यात त्याच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी रणजित सुरवसे विरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संतोष दादाराव सुरवसे यांनी फिर्याद दिली आहे.
पंचवीस हजारांची ऑनलाइन फसवणूक
जुळे सोलापुरातील सिद्धरामेश्वर नगरातील रहिवासी वीरभद्र आप्पाराव ठक्का यांची 25 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी ठक्का यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. जनता बॅंक, सोलापूरच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी ठक्का गेले होते. महिंद्रा कोटक बॅंकेच्या एटीएममधून त्यांनी दहा हजार रुपये विड्रॉल केले. मात्र, पैसे न आल्याने त्यांनी पुन्हा दहा हजारांचे विड्रॉल केले. त्या वेळी एकदाच पैसे आले, मात्र त्यांच्या खात्यातून दोनदा दहा हजार रुपये कमी झाले. त्यांनी कस्टमर केअरला कॉल करून हकीकत सांगितली. तरीही पैसे मिळाले नसल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.