
सोलापूर : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात तत्काळ शिष्यवृत्ती जमा करा, या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) राज्य कमिटीतर्फे आज (सोमवारी) आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा ः तर सोलापुरात त्वरित शटर डाऊन
या वेळी एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी म्हणाले, ""सध्या जगभरासह देशात आणि राज्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाउन आहे. कोरोना महामारीने अनेक बळी घेतले. लाखो कुटुंबांचे रोजगार हिरावून घेतले. शेतकरी, शेतमजूर, कामगार व समाजातील अशाच प्रकारची कामे करून आपले कुटुंब चालवणाऱ्यांवर आज अधिकच संकट कोसळले आहे. विद्यार्थ्यांवर देखील या महामारीचा वाईट परिणाम झाला आहे. हजारो विद्यार्थी अजूनही राज्यात, देशात आणि परदेशात अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या होरपळमध्ये शैक्षणिक वर्ष संपले आहे. आतापर्यंत राज्यातील सर्वच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित होते; परंतु आजपर्यंत राज्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.
हेही वाचा ः पंढरपुरात आणखी एक कोरोबाधित
शैक्षणिक वर्षाच्या शेवटपर्यंत शिष्यवृत्ती न मिळणे ही खूपच निंदाजनक बाब आहे. इतर कर्तव्ये पार पाडताना सरकारने शिष्यवृत्ती वितरित करण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे गंभीर आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने यावर गंभीर विचार करावा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली शिष्यवृत्ती वितरित करण्यास इतका विलंब होणे, हे ढिसाळ नियोजनाचे लक्षण आहे. याचा एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी व सोलापूर जिल्हा कमिटी निषेध करते. एसएफआयने शिष्यवृत्तीबाबत मागे 18 एप्रिल व 25 मे असे दोन वेळा ई-मेलद्वारे निवेदन पाठवले होते. आम्ही पुन्हा आपणास मागणी करतो, की येत्या आठ दिवसांत राज्यातील सर्व अभ्यासक्रमाच्या व सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करावे; अन्यथा राज्यभरात एसएफआय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडेल. यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा ः ... तर डाॅक्टरांवर मेस्मार्तंगत कारवाई
या वेळी जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, माजी जिल्हाध्यक्ष किशोर झेंडेकर, माजी सहसचिव गणेश भोईटे, सहसचिव श्यामसुंदर आडम, उपाध्यक्ष विश्वजित बिराजदार, सहसचिव पल्लवी मासन, स. मं. सदस्य राहुल भैसे, जि. क. सदस्य प्रशांत आडम, पूनम गायकवाड, दुर्गादास कनकुंटला, राजेश्वरी पडाल, अश्विनी मामड्याल, अनिल बोगा, प्रियांका कीर्तने, प्रतीक्षा गायकवाड, प्राजक्ता कीर्तने, अयान पेरमपल्ली आदी विद्यार्थ्यांसह कार्यकर्ते आंदोलना सहभागी झाले.
येत्या आठ दिवसांत राज्यातील सर्व अभ्यासक्रमाच्या व सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करावे; अन्यथा राज्यभरात एसएफआय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडेल.
- मल्लेशम कारमपुरी, एसएफआयचे सोलापूर जिल्हा सचिव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.