Sangola Politics: सांगोला राजकारणात ‘बापू-आबा’च्या कानगोष्टींनी खळबळ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरात

शहाजीबापू–दीपकआबा यांच्या ‘कानगोष्टीं’ने सांगोल्यात नवे राजकीय समीकरण? कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाच्या चर्चेला उधाण
A meeting between former MLAs Shahajibapu Patil and Deepakaba Salunkhe-Patil has sparked fresh political buzz in Sangola. Are the two leaders heading towards a new political alliance?

A meeting between former MLAs Shahajibapu Patil and Deepakaba Salunkhe-Patil has sparked fresh political buzz in Sangola. Are the two leaders heading towards a new political alliance?

Sakal

Updated on

सांगोला : विधानसभा निवडणुकीसह विविध निवडणुकांमध्ये कधी एकमेकांना साथ देणारे, तर कधी एकमेकांविरोधात शड्डू ठोकून राजकीय आखाड्यात उतरलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे दोघे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. कार्यक्रमस्थळी दोन्ही नेत्यांनी केलेले हस्तांदोलन, त्यानंतर झालेल्या गप्पागोष्टी आणि विशेषतः एकमेकांच्या कानात केलेली हितगुज सध्या सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com