
मंगळवेढा ता. 26 सकाळ वृत्तसेवा :- राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने मंगळवेढा शहरातील प्रमुख रस्त्यावर संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थिनी सादर केलेल्या लेझीम पथम ,झांज पथक, शारीरिक कसरती व चित्तथरारक शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या कार्यक्रमाला रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.