मेजर पित्याच्या तिन्ही मुलींनी गाजवले 'रणांगण'! झाल्या उच्चपदस्थ

मेजर पित्याच्या तिन्ही मुलींनी गाजवले "रणागंण'! झाल्या उच्चपदस्थ
मेजर पित्याच्या तिन्ही मुलींनी गाजवले "रणागंण'! झाल्या उच्चपदस्थ
मेजर पित्याच्या तिन्ही मुलींनी गाजवले "रणागंण'! झाल्या उच्चपदस्थCanva
Updated on
Summary

भारत-पाकिस्तानच्या 1965 व 1971 या युद्धात सहभागी होऊन रणांगण गाजवलेले मेजर शंकरराव खांडेकर.

सोलापूर : भारत-पाकिस्तानच्या 1965 व 1971 या युद्धात (india-Pakistan War) सहभागी होऊन रणांगण गाजवलेले मेजर शंकरराव खांडेकर (Major Shankarrao Khandekar). त्यांनी पत्नीसह तिन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले व खऱ्या अर्थाने राजमाता अहिल्याबाई होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या विचारांचा वारसा जपला. मेजर शंकरराव खांडेकर यांच्या मुली जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण संस्थेची संस्थापक अशा विविध उच्च पदांवर विराजमान झाल्या आहेत.

मेजर पित्याच्या तिन्ही मुलींनी गाजवले "रणागंण'! झाल्या उच्चपदस्थ
श्रावण विशेष : भाविक, पर्यटकांसाठी माचणूरची भेट म्हणजे पर्वणीच

देवळे (ता. सांगोला) हे मूळ गाव असलेल्या शंकरराव खांडेकर यांचे वडील सोलापूर महापालिकेच्या शाळेत शिक्षक होते. त्यामुळे ते सोलापूरमध्येच शिकले, वाढले. महापालिकेची शाळा, हरिभाई देवकरण प्रशाला, संगमेश्‍वर महाविद्यालय व पुणे विद्यापीठ अशा नामांकित संस्थांमधून त्यांचे शिक्षण झाले. एमएच्या पदवीनंतर ते लेफ्टनंट म्हणून आर्मीत दाखल झाले. त्यांनी 1965 व 1971 च्या भारत- पाक युद्धात सहभाग घेतला. पाकिस्तानवर चढाई करत ते 20 किलोमीटर पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. दोन वर्षे पाकिस्तानमध्ये राहिले. सिमला करारानंतर त्यांची सुटका झाली.

मेजर शंकरराव खांडेकर यांच्या पत्नी सिंधू खांडेकर यांनी एका मुलीच्या जन्मानंतर अपूर्ण राहिलेले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. बीएनंतर बीएड करून त्यांनी शांतीनिकेतन विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी केली. आता त्या सेवानिवृत्त आहेत. त्यांची पहिली मुलगी नयना खांडेकर या सध्या गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत. हैदराबाद येथे जन्म झालेल्या नयना खांडेकर यांनी सोलापूर, झाशी, हिमाचल प्रदेश येथे शिक्षण घेतले. त्यांनी उर्दू आणि पंजाबी भाषादेखील अवगत केल्या. संगमेश्‍वर महाविद्यालयातून पदवी व पुणे विद्यापीठातून एमए प्रथम क्रमांकाने पास झाल्या. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या उस्मानाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर सांगली, सोलापूर, नाशिक येथे त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून व कुर्डुवाडी येथे प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नागपूर येथे तसेच पुणे महापालिका परिवहन विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पहिले. "यशदा'च्या त्या उपसंचालक होत्या. आता गोंदियाच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहात आहेत.

मेजर पित्याच्या तिन्ही मुलींनी गाजवले "रणागंण'! झाल्या उच्चपदस्थ
नागपंचमी विशेष : पाच लाख उंदरांवर नियंत्रण ठेवणारा निसर्गरक्षक !

दुसरी कन्या अपर्णा खांडेकर-शेजाळ यांनी बीएस्सीचे शिक्षण घेत स्वत:चा कारखाना सुरू केला. कंदलगावसारख्या ग्रामीण भागात त्यांनी इंडियन पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. या शाळेत सध्या दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तिसरी कन्या रश्‍मी खांडेकर यांनी वालचंद कॉलेजमधून बीईची पदवी घेतली. गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. पुणे महसूल विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. आता त्या औरंगाबाद महसूल विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मेजर खांडेकर यांच्या तिन्ही मुलींनी उच्च शिक्षण घेतले व उच्च पदे प्राप्त केली. पत्नीनेही विवाहानंतर शिक्षण पूर्ण करत शिक्षिका म्हणून कारकीर्द केली.

ठळक बाबी...

  • मुलींच्या शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन

  • तिन्ही मुली व जावई उच्चपदस्थ

  • सैन्यातील नोकरीमुळे देशभर विविध ठिकाणी मुलींचे शिक्षण

  • विविध भाषा, संस्कृतींचा अनुभव

मुलींना शिक्षण देण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. पत्नीनेही विवाहापूर्वीचे अपूर्ण शिक्षण पूर्ण केले. माझ्या तिन्ही मुली शिक्षणामुळे उच्चपदस्थ होऊ शकल्या.

- मेजर शंकराराव खांडेकर, निवृत्त लेफ्टनंट

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा

कालबाह्य रुढी-परंपरा झुगारून मोठ्या धैर्याने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले. दानशूर, कार्यकुशल पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे कार्य समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींनी केले आहे. राजमाता अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीनिमित्ताने अशा व्यक्तींच्या यशोगाथांवर टाकलेला हा प्रकाश.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com