
कुर्डू : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना त्यांच्याच नावाने विकसित केलेल्या वाणाचा तीन किलोचा ‘शरद आंबा’ भेट देण्यासाठी अरण (ता. माढा) येथील दत्तात्रय घाडगे मुंबईला गेले अन् मुंबईत रस्ता चुकले. शेवटी शरद पवारच ताफा घेऊन त्यांना शोधत ते ज्या ठिकाणी थांबले होते, तेथे आले अन् आंबे घेतले, एका सामान्य शेतकऱ्यांसाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शोधत आले असेच म्हणावे लागेल.