

सोलापूर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा आणि दरमहा पाच टक्के व्याजदराने मोबदला घ्या असे आमिष दाखवून विजापूर रोडवरील एसआरपी कॅम्पजवळ राहणाऱ्या निवृत्ती मारुती पैलवान व त्याची पत्नी सुरेखा निवृत्ती पैलवान या दोघांनी ८० लाख रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद आशिष अशोक पाटील (वय २५, रा. न्यु संतोष नगर, जुळे सोलापूर) याने विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या व रक्कम वाढू शकते म्हणून गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.