

Political Speculation Grows Over Shashikant Chavan’s Council Prospects
sakal
मंगळवेढा : नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदेत भाजपने जोरदार कमबॅक केल्यामुळे जिल्ह्यात भाजप ताकदवान झाला. अशा परिस्थितीत विधान परिषदेला भाजपचा चेहरा कोण? नवा की जुना असणार याविषयी जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे. यात भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या रूपाने आणखीन एका नव्या नावाची भर पडली.