
सांगोला : सातत्य, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सांगोल्याची कन्या शीतल बाळासाहेब नकाते यांनी राज्यसेवेतील उच्चपदावर घवघवीत झेप घेतली आहे. एमपीएससी २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (एम.ई.एस) परीक्षेत यश संपादन केले. पाणीपुरवठा व जलसंधारण विभागात (डब्ल्यूआरडी) सहाय्यक अभियंता (वर्ग-१ अधिकारी) पदावर शीतल यांची निवड झाली आहे.