esakal | पर्यावरणप्रेमी सैनिकपत्नीने दिल्या अनेकांना स्वनिर्मित गणेशमूर्ती; "सकाळ-तनिष्का'च्या कार्यशाळेतून प्रेरणा
sakal

बोलून बातमी शोधा

Sheetal Umate

दरवर्षी "सकाळ-तनिष्का' व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने महिलांसाठी मोफत इको-फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा घेतली जाते. त्यामध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती बनवण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच प्रेरणा घेतलेल्या येथील राजस्व नगरातील शीतल शिंदे यांनाही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचा छंद जडला. गेल्या पाच वर्षांपासून त्या स्वतः इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनवतात.

पर्यावरणप्रेमी सैनिकपत्नीने दिल्या अनेकांना स्वनिर्मित गणेशमूर्ती; "सकाळ-तनिष्का'च्या कार्यशाळेतून प्रेरणा

sakal_logo
By
श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : सैन्य दलातील पतीकडून सीमारक्षणाचे होणारे अन्‌ आपण येथूनच सुरू केलेले पर्यावरण रक्षणाचे काम देशासाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचे मानत येथील सैनिकपत्नी शीतल उमाटे (शिंदे) यांनी यंदा स्वतः बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे अनेकांना वाटप केले. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश घराघरात गेला आहे. 

हेही वाचा : मनालीच्या ऑनलाइन इको-फ्रेंडली बाप्पाच्या कार्यशाळेस राज्यातून प्रतिसाद; 700 जणांनी बनवल्या मूर्ती 

दरवर्षी "सकाळ-तनिष्का' व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने महिलांसाठी मोफत इको-फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा घेतली जाते. त्यामध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती बनवण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच प्रेरणा घेतलेल्या येथील राजस्व नगरातील शीतल शिंदे यांनाही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचा छंद जडला. गेल्या पाच वर्षांपासून त्या स्वतः इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनवतात. यंदा त्यांनी स्वतःसाठीच मूर्ती न बनवता अनेकांना त्याचे वाटप करता यावे म्हणून अनेक मूर्ती बनवल्या. पर्यावरण रक्षणाचा संदेश घरोघरी पोचवण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा त्यांनी अनेकांना अशा पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे वाटप केले आहे. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. 

हेही वाचा : पोलिस पती-पत्नीच्या पुढाकारातून युवकांचा स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीचा सराव 

सैन्य दलातील परमेश्‍वर उमाटे यांच्याशी विवाह झालेल्या शीतल शिंदे यांना पर्यावरण रक्षणामध्ये विशेष रस आहे. त्यामुळेच सीमारक्षणाद्वारे सुरू असलेल्या पतीच्या देशसेवेस हातभार लावण्याचे काम आपण पर्यावरण रक्षणातून करत असल्याचे शीतल उमाटे (शिंदे) यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यांच्या या कामास पतीसह राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असलेल्या त्यांच्या आई उज्ज्वला शिंदे, भाऊ प्रसाद शिंदे तसेच सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी संजय भोईटे यांचे सहकार्य मिळाले. 

याबाबत शीतल उमाटे म्हणाल्या, पर्यावरणावरील प्रेमातून वनस्पती, झाडे, फुले, वेली यांची विशेष आवड निर्माण झाली. त्यांची हानी होऊ नये तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे व प्रदूषण होऊ नये म्हणून कार्य करण्याचे ठरवले. त्यातूनच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचे मनावर घेतले. हा संदेश सर्वांपर्यंत नेण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अनेकांना दिल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top