

Two youths killed in Jath bike-container collision on Pandharpur-Athani highway.
sakal
मंगळवेढा : पंढरपूर-अथणी राष्ट्रीय महामार्गवरील जत तालुक्यातील शेगाव गावच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर कंटेनर व दुचाकीचा ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कामन्ना संगाप्पा हत्तळी (वय २५, मूळ रा. चिक्कलगी) व सचिन गणेश व्हनमाने (वय २१, रा. शेगाव, ता. जत) असे मृत तरुणांची नावे असून आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.