

पंढरपूर: उपमुख्यमंत्री शिंदे यांना आमची एकच विनंती आहे, तानाजी सावंत यांनी २०१८-२०१९ मध्ये ज्या प्रमाणे सोलापूरमध्ये लक्ष घातले, तसे पुन्हा एकदा सोलापूरमध्ये लक्ष घालायला सांगा. शिवसेनेचे पाच ते सहा आमदार निवडून आले, असे आजच जाहीर करतो, अशा शब्दांत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सावंतांना लक्ष घालण्याची विनंती केली.