

Political U-Turn in Maharashtra: Shiv Sena District Chief Joins BJP
sakal
सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अनोखी राजकीय ''खेळी'' पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी मंगळवारी सकाळी गळ्यात ''मशाली''चा शेला घालून मोठ्या थाटात नॉर्थकोट केंद्रावर बंधू विठ्ठल व दत्तात्रय वानकर यांच्यासह प्रवेश केला. मात्र, प्रत्यक्ष केंद्रात गेल्यानंतर त्यांनी ''मशाल''चा शेला अलगद बाजूला सारत थेट भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून सर्वांनाच धक्का दिला.