
सोलापूर : चार दिवसांत शिवसेनेतील नाराज असलेल्या १२ जणांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तर आज २१ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा पक्षात मनमानी कारभार सुरू आहे. वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्याने पदाधिकारी करत आहेत. निर्णयप्रक्रियेत त्यांचा वाढता हस्तक्षेप पक्षाची वाताहत होण्यास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप करत, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, पक्षाचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्यासह १२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला.