Jyoti Waghmare biography Solapur
esakal
सोलापूर : सोलापूरमध्ये अत्यंत सामान्य कुटुंबात वाढलेल्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या गेल्या अडीच दशकांपासून आंबेडकरी चळवळ, सामाजिक प्रश्न आणि राजकीय चर्चेत सक्रिय (Jyoti Waghmare biography Solapur) राहिल्या. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथर चळवळीशी जोडलेले कार्यकर्ते होते. आई विडी कारखान्यात काम करत तर वडील हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर. या पार्श्वभूमीतूनच ज्योती यांचा संघर्षमय जीवनप्रवास सुरू झाला.