esakal | शिवसेनेत "इनकमिंग' कमी अन्‌ "आउटगोइंग'च जास्त !
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

शिवसेनेत "इनकमिंग' कमी अन्‌ "आउटगोइंग'च जास्त !

sakal_logo
By
अरविंद मोटे

सत्ता नसताना शिवसैनिक जनतेच्या प्रश्‍नावर आवज उठवत सरकारला धारेवर धरू शकतात. त्याच शिवसैनिकांसमोर सत्ता असताना राबवण्यासाठी मात्र कार्यक्रमांचा अभाव असतो.

सोलापूर : मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) सर्व जिल्हा प्रमुखांबरोबर चर्चा केली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसंपर्क अभियानाला मोठ्या धूमधडाक्‍यात सुरवात केली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेच्या या पक्षबांधणीला महत्त्व आहे. सत्ता नसताना शिवसैनिक जनतेच्या प्रश्‍नावर आवज उठवत सरकारला धारेवर धरू शकतात. त्याच शिवसैनिकांसमोर सत्ता असताना राबवण्यासाठी मात्र कार्यक्रमांचा अभाव असतो. यामुळेच सत्तेत असूनही शिवसेनेमध्ये नेत्यांची आवक कमी आहे आणि जावकच जादा आहे. (Shiv Sena party has less incoming and more outgoing leaders-ssd73)

हेही वाचा: तीन अपत्ये असतानाही महापालिका निवडणूक लढणे भोवले !

सामान्यपणे सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असते. निवडणुकीपूर्वी जो पक्ष सत्तेवर येणाची शक्‍यता आहे, त्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असतो, हे सार्वत्रिक आहे. मागील दहा वर्षे शिवसेना सत्ताधारी आहे. फडणवीस सरकारमध्येही शिवसेना घटकपक्ष होता. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे आहे, तरीदेखील शिवसेना पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिवसेना सत्तेत असताना शिवसेनेतून महेश कोठे, दिलीप माने यांच्यासारखे महत्त्वाचे नेते बाहेर पडू पाहात आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना, तसेच यापूर्वीही शिवसेना सत्तेत सहभागी होती, असे असतानाही शिवसेना पक्ष सोडून जाण्याचे प्रमाण कमी नाही. त्याचवेळी नव्याने शिवसेना प्रवेश करू पाहणारेही सध्या कोणी दिसत नाही. एकंदरीत, शिवसेनेत "इनकमिंग' कमी अन्‌ "आउटगोविंग' जास्त अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा: तिन्हीवेळा कर्जमाफीचा लाभार्थी, तरीही कर्ज मिळत नसल्याची तक्रार

सत्तेवर येऊन दीड - पावणेदोन वर्षे झाल्यानंतरही शिवसेनेची ही स्थिती आहे. इतर पक्ष सत्तेचा वापर करून पक्ष बळकट करण्याचे काम करत आहेत. मात्र, सत्ता असतानाही पक्षसंघटन मजबूत करण्यात शिवसेना कमी पडली आहे. मित्रपक्षांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली होत पक्ष संघटन बांधणीला वेग आलेला आहे. तोपर्यंत कॉंग्रेस (Congress) व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने (NCP) सत्तेचा फायदा उठवत पक्ष वाढवले आहेत. मागील अनेक वर्षांत भाजपने (BJP) शिवसेनेच्या मदतीने ग्रामीण भागात हातपाय पसरले आहेत. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यात महाआघाडीच्या तीन पक्षांत सर्वांत पुढे आहे. कॉंग्रेसचेही केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शिवसेना यात बरीच मागे आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादीने जिल्ह्यात अनेकदा विधान परिषदेच्या संधी दिल्या; मात्र शिवसेनेने सोलापूर जिल्ह्याला विधान परिषदेत संधी दिली नाही. सत्तेचा फायदा घेऊन पक्ष मजबूत करणे, कार्यकर्त्यांना मोठे करणे यात राष्ट्रवादीचा हात कोणी धरू शकत नाही, मात्र शिवसेना याबाबतीत मागे पडत आहे. अशातच आघाडी धर्म धाब्यावर बसवत राष्ट्रवादी कॉंग्रेस आपला गळ शिवसेनेच्याच तळ्यात टाकत आहे. मुख्य विरोधक असलेल्या भाजपमधील नेत्यांना फूस लावण्याऐवजी आघाडी धर्म मोडून शिवसेनेतीलच नेत्यांना ऑफर दिल्या जात आहेत.

loading image