

संगमनेर : धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी जर राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली, तर खरी धार्मिक क्रांती घडते. हीच क्रांती अयोध्येतील राम मंदिर बांधून रामराज्याच्या रूपाने देशात प्रस्थापित झाली आहे, असे गौरवोदगार त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरी महाराज यांनी काढले.