

Fire Breaks Out at Krishi Center; Heavy Financial Loss Reported
esakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या खोमनाळ नाका परिसरातील जिजामाता कृषी केंद्र हे खते बी-बियाणे विक्री करणाऱ्या दुकानास मध्यरात्री लागलेल्या आगीत जळून खाक झाले. असून यामध्ये त्यांचे कोट्यावधीचे आर्थिक नुकसान झाले. आगीच्या कारणाचा शोध घेण्याची मागणी आता पुढे येऊ लागली.