
सोलापूर: गावातील मुलासोबत पळून गेलेल्या मुलीला शोधून तिच्या आई-वडिलांनी १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावून दिला. पण, आठ दिवसांतच ती मुलगी त्याच तरुणासोबत पळून गेली. २०२३ मध्ये सांगोला पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पण, सांगोला पोलिसांना ती अल्पवयीन मुलगी दोन वर्षात सापडलीच नाही. शेवटी, सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने त्या अल्पवयीन मुलीला शोधून काढले. त्या तरुणाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून सध्या तरुण न्यायालयीन कोठडीत आहे.