Pandharpur News : इलेक्ट्रीक इंजिनिअरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीवर अत्याचार; नराधमाच्या त्रासाला कंटाळून तरुणीचा जीवन संपविण्याचा प्रयत्न

इलेक्ट्रीक इंजिनिअर विद्यार्थींनीला गोड बोलून गाडीत घालून तिच्यावर महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आली समोर.
Accused Aatish Tavate

Accused Aatish Tavate

sakal

Updated on

पंढरपूर - एका इलेक्ट्रीक इंजिनिअर विद्यार्थींनीला गोड बोलून गाडीत घालून तीच्यावर महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये अत्याचार केल्याची संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने सतत अत्याचार करुन व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीला त्रास दिला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून तिने ता. 8 एप्रिल रोजी राहत्या घरी फरसी पुसण्यासाठी वापरले जाणारे ऍसीड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com