
टेंभुर्णी : अरण येथील कार्तिक खंडाळे याचा खून त्याचा चुलतभाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय १९ रा. अरण ता. माढा) यानेच केल्याचे गुन्ह्यातील पुराव्याचे तांत्रिक विश्लेषणावरून तपासात उघड झाले. टेंभूर्णी पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता घरगुती वादातून हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पोलिसांनी अटक केली.