

Truth Revealed in Mangalwedha Patricide Case
मंगळवेढा : घरगुती कारणाचा राग मनात धरून मुलानेच वडिलाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे घडली. मात्र, या प्रकरणात मुलाने वडिलाचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव केला. परंतु पोलिसांनी काही क्षणात या घटनेचा तपास लावत मुलास ताब्यात घेतले.