
पंढरपूर : पंढरपूर शहरात माय-लेकाच्या दुहेरी हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील शिंदे - नाईक नगरमध्ये मंगळवारी (ता.१५) रात्री साडेनऊ वाजणेच्या सुमारास घडली. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी आर्थिक कारणावरून खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.