सोलापूर : गृहनिर्माण प्रकल्पाची देखरेख करणाऱ्या एकाने मालकाच्या परस्पर फ्लॅट विकून ४७ लाख ५० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.