सोलापूर : तुझ्या आई-वडिलांनी विवाहात हुंडा दिला नाही, कर्ज फेडण्यासाठी माहेरून २० लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला नांदवणार नाही म्हणून पतीने छळ केल्याची फिर्याद पुजा प्रवीण निकम (रा. मंगळवार पेठ, तुळजापूर) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यावरुन पतीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.