
पांगरी : धुतलेले कपडे सुकविण्यासाठी गेल्या असताना विजेचा धक्का लागलेल्या पत्नीला वाचविताना पतीचा विजेच्या धक्काने मृत्यू झाला. विक्रम रघुनाथ शिंदे (वय ४८, रा. बाभूळगाव) असे मृताचे नाव आहे. ही घटना बाभूळगाव (ता. बार्शी) येथे आज (ता. ८) सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान घडली.