
Negligence shock in Solapur hospital — woman delivers baby at ward door; newborn dies in mother’s hands.
Sakal
सोलापूर: गर्भवतीस कळा आल्यानंतरही डॉक्टर व परिचारिकांनी दुर्लक्ष केले. नातेवाईक त्या गर्भवतीस ऑपरेशन थिएटर मध्ये चालत नेत असताना वॉर्डाच्या दारातच तिची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार येथील विमा रुग्णालयात घडला. पोटातच मृत झालेले बाळ महिलेच्या बहिणीने हातावर झेलले. या प्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सक चौकशी करणार आहेत.