

Police investigating the transgender murder case in Solapur as accused are sent to extended custody.
Sakal
सोलापूर : येथील लष्कर परिसरातील मुर्गी नाल्याजवळ राहायला असलेल्या आयुब हुसेन सय्यद या तृतीयपंथीचा तिघांनी खून केला. दागिन्यांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. तृतीयपंथीच्या घरातून चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले असून, त्यात एक लाख ८९ हजारांचे दागिने खरे असून, अर्धा किलो दागिने बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने तिन्ही संशयितांना ५ जानेवारीपर्यंत वाढीव पोलिस कोठडी ठोठावली आहे.