
सोलापूर : येथील महात्मा नागरी पतसंस्थेकडे गहाण असलेले दोन प्लॉट तिघांनी संगनमत करून बळकावल्याची घटना समोर आली आहे. मयत झालेल्या व्यक्तीच्या नावे बनावट आधारकार्ड तयार करून त्यांच्याऐवजी तोतया व्यक्ती उभी करून ३० लाख रुपयांच्या दोन जागा बळकावण्यात आल्याची फिर्याद जी. बी. कोरत (रा. वेंगोला, एर्नाकुलम, केरळ) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.