
सोलापूर : उघड्या घरातून चोरट्याने १० तोळे दागिने चोरून नेल्याची फिर्याद येथील सुभाष नगरातील चौगुले वस्तीतील ८० वर्षीय आजीबाईने विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. शरयू रावसाहेब पाटील यांच्या फिर्यादीनुसार १३ ऑगस्ट २०२२ रोजी ही चोरी झाली आहे. या गुन्ह्यातील चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.